Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे अनेकांना तात्पुरता रोजगार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांचे उमेदवार निश्‍चित झाल्याने प्रचाराचे काम आज जोर धरू लागले आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीदेखील वाढली आहे. पथनाट्य, डिझायनिंग आणि संपादन क्षेत्रातील अनेकांना तात्पुरता रोजगार मिळत आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांचे उमेदवार निश्‍चित झाल्याने प्रचाराचे काम आज जोर धरू लागले आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीदेखील वाढली आहे. पथनाट्य, डिझायनिंग आणि संपादन क्षेत्रातील अनेकांना तात्पुरता रोजगार मिळत आहे.

फ्लेक्‍स, जाहीरनामा, पत्रके, आढावा पुस्तिका आणि सोशल माध्यमांचा वापर करून प्रचार करण्याकडे सध्या उमेदवारांचा कल आहे. मात्र त्यासाठी प्रचार गीते आणि पथनाट्यांचादेखील आधार घेतला जात आहे. त्यामुळे पथनाट्याची कथा लिहिणारे, अभिनय करणारे, ग्राफिक बनविणारे आणि ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नव्यानेच या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. पथनाट्यात काम करणाऱ्यांना एका दिवसासाठी ३०० ते ५०० रुपयांचे मानधन देऊन नाष्टा व जेवणाची सोय केली जात आहे. उमेदवाराचे निवडणुकीची बजेट किती, यावरदेखील कलाकारांचे मानधन अवलंबून आहे.

ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटर यांना प्रचार गीते व उमेदवारांच्या विकासकामांचे माहितीपट बनविण्याचे काम मिळत आहे. त्यातून ग्राफिक बनविणाऱ्यांना मागणी वाढली आहे.

प्रचाराच्या कामातून अभिनय क्षेत्रात येणाऱ्यांना स्टेज डेअरिंग व कामाची संधी मिळत आहे. पथनाट्य हे प्रबोधनाचे साधन असून उमेदवारांकडून त्याचा प्रचारासाठी वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे.
- आशिष टिळक, पटकथा लेखक

Web Title: Loksabha Election 2019 Publicity Employment


संबंधित बातम्या

Saam TV Live