गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली, आणि मग पठ्ठ्याने पुण्यातल्या रिक्षाचालकांवर कसा राग काढला तुम्हीच पाहा...

साम टीव्ही
बुधवार, 26 ऑगस्ट 2020
  • गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली
  • पठ्ठ्याने पुण्यातल्या रिक्षाचालकांवर काढला राग 
  • आशिक चोरटा चोरायचा रिक्षाचालकांचेच मोबाईल 

त्याला मोबाईल चोरी करण्याची सवय होती. तेही रिक्षावाल्यांचेच मोबाईल. पोलिसांनी त्याला अटकही केली. पण चोरी करण्यामागचं कारण त्यानं जेव्हा सांगितलं तेव्हा पोलिसही चक्रावले. असं काय सांगितलं या चोरट्यानं तुम्हीच पाहा.

हा आहे आसिफ उर्फ भुराभाई आरिफ शेख. मोबाईल चोरीप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याला अटक केलीय. पण हा काही साधासुधा चोर नाही. त्याचं आणि रिक्षावाल्यांचं खास नातं आहे. त्यानं रिक्षावाल्यांचं सूड घेण्यासाठीच हे मोबाईल चोरले आहेत. आसिफ कात्रज, कोंढवा, कॅम्प अशा परिसरात नियमित रिक्षानं प्रवास करायचा. रिक्षा गर्दीच्या ठिकाणी  थांबवल्यावर आपला मोबाइल खराब असल्याचे सांगत तो मित्राला फोन करण्यासाठी रिक्षाचालकाकडे मोबाइल मागायचा. त्यानंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जायचा.
या चोरीमागचं खरं कारण आहे आसिफची फसलेली लव्हस्टोरी
 
आसिफ हा मूळचा अहमदाबादमधील आहे.  प्रेयसीसोबत लग्न करण्यास त्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यानं अहमदाबादमधील स्वतःचं रेस्टॉरंट विकले आणि गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पुण्यामध्ये पळून आला. प्रेयसीसोबत लग्न करुन पुण्यात नवीन व्यवसाय सुरू करण्याचं त्यानं ठरवलं होतं. पण पुण्यात आल्यावर दोन दिवसांमध्येच त्याची प्रियसी आसिफकडील पैसे आणि सामान चोरून गुजरातला पळून गेली. तिचा शोध घेत आसिफ गुजरातला पोहोचला. तिथे गेल्यानंतर तिने एका रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचं त्याला समजलं. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. आसिफ पुन्हा पुण्याला आला आणि कोंढव्यात काम करू लागला पण रिक्षाचालकांबद्दल त्याच्या मनात प्रचंड अढी होती. मग काय पठ्ठ्यानं सगळ्य़ाच रिक्षाचालकांना धडा शिकवायचं ठरवलं तेही त्यांचे मोबाईल चोरून
आसिफनं आतापर्यंत रिक्षाचालकांचे 70 मोबाईल लांबवले. पण प्रेमात फसलेला पठ्ठ्या सूड घेण्याच्या नादत चोरी सारख्या वाममार्गाला लागूनही शेवटी फसलाच.


संबंधित बातम्या

Saam TV Live