पुण्यातील 7 तालुक्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुण्यातील 7 तालुक्यांत मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अफवा रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

त्याच्बारोबत आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाकेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच पुण्यात मार्केट परिसरही बंद ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या शिवाजी नगर एस. टी. स्टँडमध्येही बंदचा परिणाम पहायला मिळतोय. गजबजलेल्या स्थानकात सध्या शुकशुकाट आहे. प्रवाशांना याचा चांगलाच त्रास होतोय. 

WebTitle : marathi news pune maharashtra bandh mobile internet service suspended

संबंधित बातम्या

Saam TV Live