या भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

कार विकत घेणं हे भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. पण आजही फेरारी, जग्वार किंवा लँड रोव्हर अशा कार अजूनही आकर्षण आहेत. पुण्यातल्या धायरीच्या सुरेश पोकळे यांनी जग्वार कार घेतली. आता सव्वा कोटीची कार घेतली म्हटल्यावर त्याचं सेलिब्रेशनही जंगीच पाहिजे ना.

मग काय सुरेशभाऊंनी थेट सोन्याचे पेढेच लोकांना वाटले. सोन्याचे पेढे म्हणजे सोन्याचे वर्ख असलेले हे पेढे त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना वाटले. सोन्याचे पेढेही तेवढेच महाग आहेत. हे पेढे सात हजार रुपये किलोचे आहेत.

सुरेशभाऊंचा दिलदारपणा त्यांच्या कुटुंबीयांनाही ठाऊक आहे. आनंद साजरा करणं आणि तो वाटून घेण्याचं औदार्य सुरेशभाऊंमध्ये असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.

हौसेला मोल नाही म्हणतात याचं सुरेशभाऊ मूर्तीमंत उदाहरण आहेत. सोन्याचे पेढे वाटणाऱ्या भाऊंची त्यामुळं धायरीत चर्चा आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live