पुणे मेट्रोसाठी  बालेवाडीची जागा मंजुर  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी  येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे. या मेट्रो प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनामार्फत या प्रकल्पास कोणताही अर्थपुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी प्राधिकरणास हस्तांतरित होणाऱ्या शासकीय आणि खासगी जमिनीच्या वाणिज्यिक विकासातून निधीची उभारणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live