पुण्यातील मेट्रो आता उशीरा धावणार!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मे 2019

पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात ते पूर्ण झाले नाही. त्यातच मेट्रोच्या कामाला सुरवात झाल्यास हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. 

अशी आहे स्थिती
घोटावडे परिसरातून आयटी पार्कमधील फेज तीनमध्ये येणारा रस्ता खराब आहे. त्याचे रुंदीकरण नसून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजूला खडी आणि वाळू असल्याने अपघाताची शक्‍यता आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण केले नाही. मे अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.  

चांदे-नांदे भागातून आयटी पार्ककडे येणाऱ्या रस्त्यांपैकी एमआयडीसीच्या ताब्यात असणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. पूर्वी हा रस्ता साडेपाच मीटर होता. तो आता साडेसात मीटर रुंद केला आहे. मात्र, चांदे जिल्हा परिषद शाळेकडून म्हाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. म्हाळुंगे फाटा भागातून जाणाऱ्या रस्त्याचे काम पीएमआरडीने सुरू केले असले तरी, ते पूर्ण होण्यास तीन-चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.

एमआयडीसीने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा या भागातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. 
- नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क

Web Title: Pune Metro Hinjewadi IT Park Work Issue Traffic

संबंधित बातम्या

Saam TV Live