आधुनिक सेवायुक्त प्रवास देणारी मिडी बस नागरिकांसाठी ठरली अपयशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

पुणे - शहराच्या मध्य भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि नागरिकांना आधुनिक सेवायुक्त प्रवास देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी मिडी बस खरेदी केल्या. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. बसची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने मागील काही महिन्यांपासून सुमारे ३५ बस बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएमपीच्या ताफ्यात मार्च २०१८ पासून २०० मिडी बस टप्प्याटप्प्याने आल्या. यातील बहुतांश बसमधील इलेक्‍ट्रिक बोर्ड, थांब्याची माहिती ही यंत्रणा म्हणजे ‘आयटीएमएस’  बंद होती.  ही यंत्रणा व्यवस्थित सुरू झाली आणि बसची देखभाल व्यवस्थित राखली न गेल्याने नवीन बस बंद पडू लागल्या. गेल्या वर्षभरात शेकडो वेळा या बस रस्त्यावर बंद पडल्या आहेत. या दोनशे बसपैकी ३० ते ३५ बस दुरुस्तीअभावी आगारामध्ये उभ्या आहेत. 

‘‘मिडी बसची देखभाल आणि दुरुस्ती संबंधित कंपनीच्या निकषांप्रमाणे होत नाही. काहीवेळा खराब बसदेखील रस्त्यावर उतरविल्या जातात, त्यामुळे काही बसमध्ये मोठा बिघाड झालेला असून, अशा बस आगारामध्ये उभ्या आहेत,’’ अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, याविषयी पीएमपीच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

मिडी बसच्या मूळ उद्देशाला हरताळ
शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून पीएमपीने ९ मीटर लांबीच्या २०० मिडी बस खरेदी केल्या. मात्र, या बस शहराच्या मध्य भागात न चालवता लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे अरुंद रस्ते आणि गर्दीच्या भागात पीएमपीची सेवा पुरविण्याच्या उद्देशाला पीएमपीकडून हरताळ फासला गेल्याचे उघड झाले आहे.

पीएमपीच्या मिडी बसची देखभाल व्यवस्थित करण्यात येत असल्याचे पीएमपी प्रशासन सांगत आहे. मात्र, बसची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने या बस बंद पडत आहेत.
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

 Web Title: midi bus pune

संबंधित बातम्या

Saam TV Live