''दोषींवर जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई केली जाईल" : विजय शिवतारे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

पुणे : कोंढव्यातील कांचन डेव्हलर्पस यांच्या काम सुरु असलेल्या सोसायटीमध्ये मध्यरात्री (ता. 29) झालेल्या दुर्घटनेमध्ये हर्लगर्जीपणा स्पष्ट दिसत आहे असे मत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. 

पुणे : कोंढव्यातील कांचन डेव्हलर्पस यांच्या काम सुरु असलेल्या सोसायटीमध्ये मध्यरात्री (ता. 29) झालेल्या दुर्घटनेमध्ये हर्लगर्जीपणा स्पष्ट दिसत आहे असे मत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. 

''दोषींवर जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई केली जाईल. एवढ्या मोठ्या भिंतीशेजारी तात्पुरती घरे बांधणे चूकचीचे आहे,'' असे मत शिवतारेंनी व्यक्त केले. 
 
घटनेबाबत प्रथामिक माहिती मिळाल्यावर शिवतारेंनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह दुर्घटनेची पाहणी केली.  

कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 16 जण ठार झाले. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही भिंत मोठी होती आणि त्यामुळे कामगारांची घरे खड्ड्यात होती. 

Web Title: Minister Of State Vijay Shiwatare slams builder for his reckless for Kondhwa Accident

संबंधित बातम्या

Saam TV Live