नवीन वर्षात पुणे महापालिकेच्या शाळांना १२८ दिवस सुट्या

नवीन वर्षात पुणे महापालिकेच्या शाळांना १२८ दिवस सुट्या

पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांसह सर्व शाळांची घंटा या वर्षात केवळ २३७ दिवसच वाजणार आहे. कारण १२८ सुट्या असणार असून, त्यात सण व उत्सवांसाठीच्या ३१ सुट्यांचा समावेश आहे.  पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी २०२० मधील सुट्यांचे नियोजन केले असून, त्याबाबत सोमवारी परिपत्रक काढले.

शहरातील महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत प्राथमिक व माध्यमिक शाळांना हे आदेश लागू असतील. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी २३७ दिवस शाळांचे कामकाज चालणार आहे. उर्वरित १२८ दिवस शाळा बंद असतील. सुटी ३० एप्रिल ते १३ जून; तर शिक्षकांसाठी ८ मे ते १३ जून या कालावधीत राहतील. दिवाळी सुट्या ९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत राहणार आहेत.

मराठी शाळांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना या सुट्या लागू राहणार आहेत. खासगी शाळांना याऐवजी इतर सुट्यांचे नियोजन करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह पालिकेची मान्यता घेणे अनिवार्य आहे. परवानगी न घेता अन्य दिवशी सुटी घेतल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

Webtitle: Pune Municipal schools have 128 days holidays in this new year

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com