तोंडावर चंद्रकांत पाटलांच्या लगामच नाही - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना "वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा करावी. परंतू, लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी बोलायची सवयच चंद्रकांत पाटील यांना लागली आहे, अशी टाकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

पुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना "वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा करावी. परंतू, लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी बोलायची सवयच चंद्रकांत पाटील यांना लागली आहे, अशी टाकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

पुण्यात कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी आमदार आंधारात भेटायला जातात असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते, त्यावर अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील हे सिनीयर झाले आहे, पक्षाचे अध्यक्ष आहे, मंत्री आहेत, विधान परिषदेतील नेते आहेत. राजकारणात काही गोष्टी राजकीय दृष्टीकोनातून बोलल्या जातात. पण आता त्यांना प्रत्येकवेळी काहीही काही बोलतात. त्यांना लोकप्रतिनीधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम त्यांनी थांबवावे. 
असे बोलले की मिडीयाला खाद्य मिळते, त्याच्या बातम्या होतात, मग काही भागातल्या लोकांना आपला लोकप्रतिनीधी वेगळ आगळा करतोय का असं वाटत. पण चंद्रकात पाटील यांचा हा स्वभाव आहे. त्याला औषध नाही. 

सरकार चालविणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन कारवाई करायची असते. त्यांनी मोर्चा काढायचा नसतो. शिवसेनेचा प्रशासनावर वकुब नाही, प्रश्‍न सोडवता येत नसल्याने मोर्चा काढून शेतकऱ्यांसाठी काही तरी करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.अशी टीका शिवसेनेवर अजित पवार केली. दरम्यान, शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा केला असला तरी ज्याच्याकडे 145 आमदार असतील त्याचाच मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही पवार म्हणाले, 

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे, त्याबाबत अजित पवार म्हणाले, पक्षाला नोटीस आल्याचे मी वृत्तपत्रातून वाचले आहे. त्यावर उद्या बैठक आहे. त्यामध्ये नेमकी कोणती त्रुटी राहिली आहे हे पाहूण पक्ष त्या नोटीशीला उत्तर देईल. तेसच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला जागा मागण्याचा अधिकार आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जागावाटप करण्यासाठी पक्षाचे नेते निर्णय घेतील.

Web Title: NCP leader Ajit Pawar attacks BJP state president Chandrakant Patil


संबंधित बातम्या

Saam TV Live