310 रुपयांत लग्न उरकवून वाचलेल्या पैशाने पत्नीला देणार उच्च शिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

पुणे : 'लग्न करण्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे असा महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लग्नातून वाचलेला पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देणे असे निर्णय खडकवासला येथील तरुण जोडप्याने जोपासला आहे. 

पुणे : 'लग्न करण्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे असा महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लग्नातून वाचलेला पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देणे असे निर्णय खडकवासला येथील तरुण जोडप्याने जोपासला आहे. 

मराठा समाजातील व अहिरे गावातील चि.श्री.विशाल राजेंद्र चौधरी व खडकवासला येथील चि.सौ.का.सौ.भाग्यश्री भरत मते यांनी यांनी आज नोंदणी पद्धतीने विवाह केला. यासाठी अवघा 210 रुपये, दोघांसाठी हार 100 रुपये असे मिळून 310 रुपये खर्च आला. असा नोंदणी विवाह करून लग्नातील अनाठायी खर्च टाळावा. तो खर्च त्यांच्या संसाराच्या प्रगती शिक्षणासाठी वापरावं. महागाईच्या काळात तरुण पिढी समोर एक नवा संदेश दिला आहे.

विशाल हा वास्तुविशारदचा डिप्लोमा केला आहे. तो मागील 12 वर्षांपासून बांधकाम व्यवसायात असून सध्या त्याची स्वतःची फर्म आहे. भाग्यश्री ने कला शाखेची पदवी, आयुर्वेद डिप्लोमा केला असून सध्या भारती विद्यापीठात वास्तूविशारद (आर्किटेक्चर) च्या पाचव्या वर्षात शिकत आहे. 

महात्मा फुले यांच्यावरील पुस्तक वाचताना त्यांनी लग्नात पैसे वाया का घालवायचा हा विचार मला पटला. त्यामुळे लग्न करताना त्याने भाग्यश्रीच्या घरातील लोकांना आणि स्वतःच्या आई वडिलांना हा निर्णय समजावून सांगताना दोन्ही घरातील व नातेवाईक यांचा विरोध, नाराजीला सामोरे जावे लागले. नोंदणी विवाह केल्यानंतर किमान आळंदीला जाऊन साध्या पद्धतीने विवाह करा असा आग्रह होता. तो ही यांनी मान्य केला नाही. फक्त नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा हाच निर्णय शेवटपर्यंत ठेवला. अखेर दोन्ही घरातील सर्वांनी अखेर मान्य केला.

"शहरालगत असलेल्या गावातील लग्नामध्ये लोक लाखो रुपये खर्च करून लग्नासाठी किमान पाच ते सहा- लाख रुपये खर्च येतो. एवढ्या पैशाची उधळण होते. लग्नातील वाचलेल्या पैशातून भाग्यश्रीच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजे तिला मास्टर ऑफ आर्किटेक्चर किंवा एम टेक करण्याचा मानस आहे. हे शिक्षण परदेशात किंवा भारतात घेण्यासाठी वापरणार आहे. असा मनोदय नवरदेव 'विशाल'ने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

लग्नातील नातेवाईकांच्या देणेघेणे मानापानासाठी जोरदार लग्न लावून देण्यासाठी कर्ज काढून, जमीन शेती विकली जाते. असा अनाठायी खर्च टाळा. यातुन आपली प्रगती करा. असा संदेश नवरी 'भाग्यश्री' ने सकाळशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Only 310 rupees were spent on marriage in Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live