पुणे पोलिसांचा संभाजी भिडेंना अप्रत्यक्ष इशारा..

विशाल सवनेसह विजय पाटील आणि अमोल कविटकर साम टीव्ही पुणे
मंगळवार, 25 जून 2019

संभाजी भिडे यांना वारीत सहभागी होऊ देऊ नये अशा आशयाचं पत्रच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुणे पोलिसांना दिलंय. या पत्राची दखल घेत पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

संभाजी भिडे यांना वारीत सहभागी होऊ देऊ नये अशा आशयाचं पत्रच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुणे पोलिसांना दिलंय. या पत्राची दखल घेत पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

दोन वर्षापुर्वी या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आल्या असताना संभाजी भिडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह हातात नंग्या तलवारी घेऊन वारीत प्रवेश केला होता. मात्र भिडेंचा हा प्रयत्न वारकरी संप्रदायाने हाणून पाडला होता. त्यामुळे गेल्या वर्षी भिड़े व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी हाती कोणतंही शस्त्रं न घेता शिवाजीनगर परिसरात पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील. पण पालखी सोहळ्यात नवे पायंडे निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी पुणे पोलिसांनी दिलीय. पुणे पोलिसांचा हा इशारा म्हणजे शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंना दिलेला अप्रत्यक्ष इशारा असल्याची चर्चा आहे. 

या पार्श्वभुमीवर शहरात दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यात भिडेंच्या भुमिकेकडे लक्ष लागलंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live