पुणेरी पोलिसांच्या रंजक पाट्या..

अमोल कविटकर
शनिवार, 15 जून 2019

पोलिस आयुक्त कार्यालयात लावण्यात आलेल्या पाट्या बरंच काही सांगून जातात. यातून पुणेकरांचं प्रबोधन तर होतंय शिवाय पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या महाभागांचेही चांगलेच कान पिळण्यात आलेत.

भारतीय कला प्रसारिणी सभा यांनी या हटके पाट्या तयार केल्या आहेत. गुन्हेगारी. वाहतूकीचे नियम आणि हेल्मेट याविषयी पुणेकरांमध्ये त्यांच्याच पद्धतीनं जागृती व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय.

पुणेरी पोलिसांच्या रंजक पाट्या :: 

  • आमच्या येथे महीला कक्ष असला तरी पुरुषांच्या सांसारिक अडचणी सोडवल्या जातील.
  • आमच्या सर्वत्र शाखा आहेत आणि तिथे नागरीकांचे स्वागत आहे.
  • 100 नंबर हा फुकट आहे, म्हणून तो कोणत्याही कारणासाठी डायल करु नका !
  • नको बंड, नको दंड! हेल्मेट घालुन, डोक ठेवु थंड!!

पुणेरी पाट्या आपल्या विक्षिप्तपणासाठी जास्त प्रसिद्ध आहे. अनेकदा या पाट्या विद्वत्तापूर्णही असतात. या पाट्यांमधून कधी पुणेकर आपला राग व्यक्त करतात तर कधी चौकशीबहाद्दरांना शालजोडीतून हाणतात. त्यात आता भर पडलीय ती पोलिसांच्या पाट्यांची. आता पोलिसांचा हा रंजक खाक्या पुणेकरांच्या कितपत पचनी पडतोय हेच पहावं लागेल.

Webtitle : marathi news pune police uses puneri patya for awarenes  

संबंधित बातम्या

Saam TV Live