मॉन्सून आणखी काही दिवस वेटिंगवर; सध्यातरी वातावरणातील उष्मा नाहीसा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या गुरुवारी (ता. 13) महाराष्ट्राला धडकणार असला, तरीसुद्धा राज्यातील पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील उष्मा काहीसा कमी झाला होता. विदर्भ, मराठवाड्यातील तापमानही कमी झाले आहे. मॉन्सूनचे आगमन तळकोकणात होणार असले, तरीही दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्याला अन्‌ उन्हाच्या चटक्‍यांनी भाजून निघालेल्या विदर्भाला पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आले आहेत. वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतचा मॉन्सूनचा प्रवास पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पूर्ण होईल. तो गुरुवारपर्यंत तळकोकणात दाखल होईल. दक्षिण महाराष्ट्रात सलामी दिल्यानंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सून प्रवास करेल. या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता असल्याने मॉन्सूनची वाटचाल मंदावणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मॉन्सूनच्या पावसासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही मॉन्सून उशिराने दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आज प्रगती शक्‍य 
केरळ, तमिळनाडू राज्यांच्या दक्षिण भागात मॉन्सूनने शनिवारी दमदार हजेरी लावली. केरळमध्ये आठवडाभर उशिराने पोचणाऱ्या वाऱ्यांनी केरळमधील कोची, तर तमिळनाडूतील मदुराईपर्यंतची मजल मारली आहे. संपूर्ण केरळ, तमिळनाडूच्या आणखी काही भागांत सोमवारपर्यंत मॉन्सूनची प्रगती शक्‍य आहे. तसेच, ईशान्य भारतातील राज्यांमध्येही मॉन्सून धडकण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत 
लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात येत्या मंगळवारपर्यंत (ता. 11) अतितीव्र कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकून अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. 

कोकणात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार 
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे केरळ, लक्षद्वीप, कनार्टक, कोकण, गोव्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. कोकणात येत्या मंगळवारपासून (ता. 11) जोरदार पावसाची शक्‍यता असून, किनाऱ्यावर वेगाने वारे वाहणार आहेत. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्‍या पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

मॉन्सून आधीचा शिडकावा 
पुण्यामध्ये जोराचा पाऊस 
यवतमाळला वादळी वाऱ्याचा तडाखा 
औरंगाबादेत हलक्‍या पावसाचा शिडकावा 
हिंगोलीत जिल्हाभर सर्वदूर पाऊस 
साताऱ्यात विविध ठिकाणांवर वादळी पाऊस 
सोलापूरला जोरदार पावसाचा तडाखा 

Web Title: Pre-monsoon rain in maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live