१९७ देशांची नावे सांगितली अवघ्या ९४ सेकंदांमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

पुणे - स्मरणशक्ती व एकाग्रतेवर आधारित पाठांतर स्पर्धेत पिंपरीतील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या प्रीत शिरोडकर या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांचा विश्‍वविक्रम केला आहे. या स्पर्धेत प्रीतने जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदांत सांगितली.

पुणे - स्मरणशक्ती व एकाग्रतेवर आधारित पाठांतर स्पर्धेत पिंपरीतील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या प्रीत शिरोडकर या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांचा विश्‍वविक्रम केला आहे. या स्पर्धेत प्रीतने जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदांत सांगितली.

‘वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया’ आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निरीक्षणाखाली १७ डिसेंबर २०१८ मध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. जानेवारीमध्ये अंतिम स्पर्धा घेण्यात आली. त्यात त्याने ९४ सेकंदांत १९७ देशांची नावे सहजपणे उच्चारली. त्यामुळे त्याला जगातील सर्वांत लहान व वेगवान असल्याचा मान मिळाला. अचाट बुद्धिमत्तेच्या बळावर २०१७ त्याने ‘पिरॉडिक टेबल’ पाठांतर स्पर्धेत ५६ सेकंदांत ११८ केमिकल इलिमेन्ट्‌स बिनचूक बोलण्याचा जागतिक विक्रम केला होता. या इलिमेन्टसची प्रीतने सलग व उलटी गणती केली होती. त्यात त्याने यूकेतील एका साडेनऊ वर्षीय मुलीच्या नावावर असलेला ६३ सेकंदांत उलट उच्चार करण्याचा विक्रम मोडला होता. आता त्याने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. 

तो पिंपळे सौदागर येथील रहिवासी असून, त्याचे वडील डॉ. राजेश शिरोडकर हे मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडून योग्य अचूक मार्गदर्शन, तर आई प्रज्ञाकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत असल्याने त्याने सांगितले. या विश्‍वविक्रमाबद्दल त्याचा शाळेत नुकताच सत्कार करण्यात आला. त्याला प्रमाणपत्र, सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. कौशिक कुलकर्णी, शाळेचे संचालक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन इंडियाचे ओम महाजन, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ इंडिया समूहाचे व्यवस्थापक पवन सोळंकी यांनी त्याचे कौतुक केले.

Web Title: Prit Shirodkar World Record Country Name


संबंधित बातम्या

Saam TV Live