शुक्रवारी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाला. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांतील साठ्यात किंचित वाढ झाली. सध्या प्रकल्पात सात टक्‍के पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट कायम आहे.

une/" id="form1" method="post">

पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाला. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांतील साठ्यात किंचित वाढ झाली. सध्या प्रकल्पात सात टक्‍के पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट कायम आहे.

ग्रामीण भागातील सिंचनासाठी आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळी पिकांसाठी एकच आवर्तन देण्यात आले. तसेच, शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात 97 मिलिमीटर, वरसगाव 66 मिलिमीटर, पानशेत 72 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या परिसरात 28 मिलिमीटर पाऊस झाला.

खडकवासला पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
टेमघर 00
वरसगाव 0.64
पानशेत 1.34
खडकवासला 0.37
एकूण 2.35 (गतवर्षी 2.98)

Web Title: Pune Dam Water Storage Increase

संबंधित बातम्या

Saam TV Live