पुण्यात नाले साफ करण्यासाठी केले १६० कोटी खर्च,पण नाले अजूनही साफ झालेच नाहीत!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

पुणे - शहरातील विशेषत: लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईसह देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल १६० कोटी रुपये खर्च केले. एवढा खर्च झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांत कुठे गाळ, कचरा आणि झाडे-झुडपे दिसणार नाहीत, असे वाटले; पण जेव्हा, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने निरनिराळ्या भागांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा याच्या नेमके उलटे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. परिणामी, पावसाळ्याच्या तोंडावर शहर आणि उपनगरांतील ओढे, नाले, गटारे शंभर टक्के साफ केल्याचा दावा ठोकणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर चकाचक ठेवण्याची घोषणा महापालिकेकडून केली जाते. त्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून कामे करण्यात येतात. ओढे-नाल्यांतील गाळ कचऱ्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन तेथील घरांना धोका होऊ नये, हा या कामांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात मात्र, ओढे-नाल्यांच्या स्वच्छतेची कामे न करता महापालिका केवळ तोंडदेखलेपणा करीत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्याचा परिणाम, ओढे-नाल्यांजवळची घरे कोसळण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. खबदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के कामे केल्याचा देखावा महापालिकेतील पदाधिकारी-अधिकारी करीत आहे. त्याच वेळी टिपलेली छायाचित्रे नेमकी वस्तुस्थिती दाखवत आहेत. 

ऐंशी टक्‍के कामे झाल्याचा दावा 
पावसाळ्याच्या तोंडावर आल्याने महापौर मुक्ता टिळक यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेतला. तेव्हा, ७० ते ८० टक्के कामे आटोपल्याचे दाखवून या काळात नागरिकांसाठी काय सेवा-सुविधा असतील, याचेच सादरीकरण प्रशासनाने केले. मात्र, ओढे-नाल्यांची कामे आठवडाभरात शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता पंधरा दिवस होत आले, तरी एकही काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा ओढे-नाले तुंबण्याची भीती आहे. 

Web Title: Pune has spent Spent Rs 160 crore but the drains have not been cleared yet!

संबंधित बातम्या

Saam TV Live