पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा वाहतूक २६ जुलै ते ९ ऑगस्ट पर्यंत बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे - पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. पुणे-मुंबई यादरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन एक्‍स्प्रेस या गाड्या १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस पुणे-मुंबई यादरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे १५ दिवस हाल होणार आहेत.

लोणावळा ते कर्जत यादरम्यान दरड कोसळून अपघात होऊ नयेत, यासाठी या भागात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या काळात खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस या गाड्या मुंबईहून सुटतात.

मात्र, या काळात त्या पुण्याहून सुटणार आहेत आणि पुण्यापर्यंत धावणार आहेत. तसेच, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर बंद ठेवण्यात आली आहे. नांदेड-पनवेल पुण्यापर्यंतच धावणार आहे. पुणे-भुसावळ गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून, ही गाडी मनमाडमार्गे धावेल. या गाड्यांव्यतिरिक्त पुणे-मुंबई मार्गातून धावणाऱ्या इतर गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: Pune Mumbai Railway Transport close for repairing

संबंधित बातम्या

Saam TV Live