सुनील गावसकरांना 1984 मध्ये काँग्रेस ने दिली होती उमेदवारीची ऑफर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 1984मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' आणि 'परांजपे स्कीम्स'तर्फे ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या "सिम्पल एक्‍स्पो' या प्रदर्शनातील मुलाखतीत ते बोलत होते. वरिष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी ही मुलाखत घेतली.  

''मला 2004 पर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव येत होता. राजीव गांधी यांनी 1984मध्ये उमेदवारी देऊ केली होती. मात्र, मी निवडणुकीदरम्यान क्रिकेटमधील कामगिरी खालावल्यास तुम्हाला दोष दिला जाईल, अशा शब्दात उमेदवारीचा चेंडू शिताफीने टोलवला,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्याला क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष करण्याचे स्वप्न 2014 मध्ये आयपीएलचा अध्यक्ष बनल्यावर पूर्ण झाले, असही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

भारतात यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात नव्या डावाला सुरवात केली आहे. यापूर्वी किर्ती आझाद, चेतन चव्हाण, महंमद कैफ, नवज्योतसिंग सिद्धू आणि श्रीशांत यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

Web Title: Rajiv Gandhi offered candidature to sunil gavaskar in 1984

संबंधित बातम्या

Saam TV Live