पुण्यात दहशत माजवत गुंडांनी केली गाड्यांची तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जून 2019

पुणे : बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पौडरस्त्यावरील केळेवाडी भागात दहशत माजवत गुंडांनी गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेचा नागरिकांनी निषेध करत संताप व्यक्त केला.  

सागर बळीराम चिकणे, रा. राऊतवाडी, गल्ली क्र. 8 यांनी या प्रकरणी एरंडवणा पोलिस चौकीत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये 16 दुचाकी व वीज मीटरचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. नरेश वाळुंज या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांना सोबत घेवून हे कृत्य केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

म्हातोबादरा, सुतारदरा, किष्किंधानगर आणि केळेवाडी परिसरात अशा घटना नेहमीच घडत असतात. गुंडांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस अपयशी ठरले असून वरिष्ठांनी यात लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: criminals breaks out vehicles in kelewadi at Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live