रिंगरोडवर विमानही उतरणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

पुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्‍ट्रिक चार्जिंग पॉइंटदेखील उभारण्यात येणार आहे. या सुविधा असलेला राज्यातील हा पहिला रिंगरोड असणार आहे.

पीएमआरडीएच्या वतीने विकसित करण्यात येणारा हा रिंगरोड १२८ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा असणार आहे. १२८ किलोमीटरपैकी चार किलोमीटर हा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. सहा उड्डाण पूल आणि सात बोगदे असणारा हा रिंगरोड आठ पदरी असून, दोन्ही बाजूस दोन सेवारस्ते असणार आहेत. प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर चार्जिंग पॉइंट असणार आहे.

हा रस्ता विकसित करताना अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा या मार्गावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला चालना देणारे धोरण तयार केले आहे.

त्यानुसार २०२० मध्ये ही वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा वाहनांसाठी आवश्‍यक असलेल्या चार्जिंग पॉइंटची सुविधादेखील या मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर रस्त्यावरून दुचाकी जाताना तिची बॅटरी चार्जिंग कसे होईल, अशी सुविधादेखील त्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकाराची सुविधा असलेला राज्यातील हा पहिला महामार्ग असणार आहे.

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या रस्त्यावर तीन ठिकाणी विमानदेखील उतरविता येईल. दिल्ली ते आग्रादरम्यान विकसित करण्यात आलेल्या महामार्गावर हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर रिंगरोडवर ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे,
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

तीन वर्षांत करणार काम पूर्ण
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांत रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. सात महामार्गांना हा रिंगरोड जोडणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून भविष्यात दररोज दोन ते अडीच लाख वाहने ये-जा करतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live