ऐकावे ते नवलचं; वाहतूक कोंडीमुळे दिली शाळेला सुट्टी  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मोर्चे, आंदोलन, बंद किंवा आपत्कालीन परिस्थितीत शाळा बंद ठेवल्याचे आपण अनेकदा ऐकले; मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवल्याची वेळ वाघोलीतील लेक्‍सिकॉन स्कूलवर आज आली. श्रावणी सोमवारच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने शाळेने सुटी जाहीर केली. पालकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.

वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबत "सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही.  वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या भागातून दर तासाचा किमान सात हजार वाहानांची ये-जा होत असते.

त्यातच बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहतूक, अरुंद रस्ता यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यातच श्रावणी सोमवारनिमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. या कोंडीने त्रस्त झालेल्या लेक्‍सिकॉन स्कूलने चक्क सुटी जाहीर केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live