यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ

यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ

पुणे - शाळांच्या सुट्या संपून आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. यामुळे बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने पालकांचे खिसे रिकामे होत आहेत. तर, या साहित्यावरील वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. 

शालेय साहित्य खरेदीत छोटा भीम, बार्बी, मोटारी, क्रिकेटपटूंची चित्रे असलेल्या बॅग आणि परीक्षा पॅडला विद्यार्थ्यांची पसंती आहे. या वर्षी पेन, पेन्सिल, वह्या, टिफीन बॉक्‍स, वॉटर बॉटल, सायन्स किट, चित्रकला किट, जॉमेट्रिक बॉक्‍स खरेदी होत आहे. बाजारात चायनीज स्टेशनरीही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे पाऊच, तसेच फॅन्सी कंपासचे आकर्षण जास्त आहे. त्याचबरोबर तयार प्रोजेक्‍ट, तयार वार्षिक नियोजन पत्रक, फ्लॅश कार्ड, पांढरा काळा-फळा यालादेखील मागणी आहे. दर वर्षीच्या तुलनेत वह्या-पुस्तकांना लावण्यासाठी असणाऱ्या खाकी, प्लॅस्टिकच्या कव्हरची जास्त विक्री होत आहे. या कव्हरच्या किमतीत गेल्या वर्षीपेक्षा १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. वह्यांच्या किमतीत १० ते १५% वाढ झाली आहे. मागच्या वर्षीपेक्षा शालेय साहित्याचे दर १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. 

आताच्या काळात अभ्यास कमी आणि प्रकल्प अधिक असतात. त्यामुळे मुलांच्या शालेय साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वर्षभरात या शालेय साहित्यासाठी विशिष्ट रक्कम बाजूला ठेवावी लागत आहे.
- अश्‍विनी ओतारी, पालक

अवास्तव सवलतींमुळे ग्राहकांची पसंती ऑनलाइन खरेदीला आहे. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना चांगली सवलत द्यावी लागते. परंतु, शालेय साहित्य खरेदी-विक्रीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) द्यावा लागत असल्यामुळे नफा कमी होत आहे. 
- विनोद करमचंदानी, शालेय साहित्य विक्रेते

Web Title: School Literature Prices Increased 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com