पालकांनी शाळेचं शुल्क न भरल्याने निकाल न देण्याचा शाळेचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

पुणे - आगामी शैक्षणिक वर्षाचे शुल्क न भरल्यामुळे टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या इंदिराबाई रामचंद्र करंदीकर शाळेने सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाचा निकाल न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पुणे - आगामी शैक्षणिक वर्षाचे शुल्क न भरल्यामुळे टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या इंदिराबाई रामचंद्र करंदीकर शाळेने सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाचा निकाल न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शाळेचे शुल्क न भरणाऱ्या पालकांची संख्या सुमारे १२८ आहे. शिक्षक पालक संघाच्या बैठकीत शाळेने हा निर्णय घेतला आहे. पालकांनी वेळेत शुल्क भरावे, म्हणून पुढील वर्षाचे शुल्क आधीच भरण्याची सूचना काही दिवसांपूर्वी दिली होती. परंतु, संबंधित पालक गुरुवारी (ता. २) शाळेत आल्यास त्यांना विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रत दिली जाईल, असे शिक्षण संचालिका नेहा दामले यांनी सांगितले.

Web Title: School stop result because of not paying the fees for the academic year

संबंधित बातम्या

Saam TV Live