जेष्ठ लेखिका आणि कवयत्री कविता महाजन यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

प्रसिद्ध लेखिका आणि कवयत्री कविता महाजन यांचं न्यूमोनियामुळे निधन झालंय.. पुण्यातील बाणेर इथल्या चेलाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्याभरापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता.

ब्र, भिन्न आणि कुहू या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या, तर जोयानाचे रंग, बकरीचं पिल्लू हे त्याचं बालसाहित्य. 2008 मध्ये कविता महाजन यांना यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्या राज्यस्तरीय पुरस्काराने आणि दामीच्या भाषांतराच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. याचवर्षी त्यांना कवयित्री बहिणाई पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

WebTitle : marathi news pune senior writer and poet kavita mahajan passes away

संबंधित बातम्या

Saam TV Live