सेट परीक्षेचा अभ्यास करा आता मोबाईल ॲपवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

पुणे - तुम्ही सेट परीक्षा (महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा) देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

पुणे - तुम्ही सेट परीक्षा (महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा) देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

दोन माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘एमएच-सेट पेपर १- क्वेशन ॲण्ड ॲन्सर की’ हे विनामूल्य ॲप नुकतेच कार्यान्वित केले आहे. भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अमित भालेराव आणि एम.टेक. झालेले रोशन केदार या दोघांनी ते विकसित केले आहे. या ॲपमध्ये गेल्या आठ वर्षांतील सेट परीक्षेमधील पेपर क्रमांक एक आहे. त्याचबरोबर या पेपरची उत्तरेही आहेत. परीक्षेचा सराव आणि अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थी गेल्या काही वर्षांतील पेपरचा अभ्यास करतात. पण प्रत्येकवेळी इंटरनेटवर जाऊन पेपर डाउनलोड करणे त्यांना शक्‍य नसते. मात्र आता या ॲपमुळे हा अभ्यास करणे अधिक सोपे होईल, असे अमित भालेराव यांनी सांगितले. या ॲपवर सेटच्या गेल्या आठ वर्षांतील पेपर एक आणि त्यांची उत्तरे आहेत. परंतु आगामी काळात प्रश्‍नांच्या उत्तरांचे विश्‍लेषणही देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे केदार यांनी सांगितले.

 Web Title: Set Study on Mobile App


संबंधित बातम्या

Saam TV Live