आता मोदींच्या हातात हात देत नाही, लांबूनच नमस्कार : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : "पवारांनी बोटाला धरून राजकारण शिकवलं म्हणणाऱ्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान समोर आल्यानंतर आम्ही हातात हात देत नाही तर हात जोडण्याचं काम करतो," असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.

पुणे : "पवारांनी बोटाला धरून राजकारण शिकवलं म्हणणाऱ्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान समोर आल्यानंतर आम्ही हातात हात देत नाही तर हात जोडण्याचं काम करतो," असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यवेळी ते बोलत होते. विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, प्रशांत जगताप, निलेश मगर, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पवार म्हणाले, "देशांमध्ये आराजकतेचे वातावरण माजवले आहे. नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रदेशात गेले व तेथे स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र देशातील जनतेला नोटबंदीमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. शेकडो मृत्यू झाले. छोटे व्यापार संपले. काळा पैसा बाहेर काढण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी मात्र कोणताही काळा पैसा परत आणला नाही. रिझर्व बँकेच्या माजी गव्हर्नर अधिकाऱ्यांनी या नोटबंदी वर टीका केली, तसेच मनमोहनसिंग सरकारच्या काळात जी विमाने आम्ही  घेणार होतो तीच विमाने महागड्या पैशात घेऊन मोठा भ्रष्टाचार विद्यमान केंद्र सरकारने केला आहे. राफेल कराराची चौकशी करा, कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी केल्यावर ती गुप्त आहेत, दाखवता येत नाही, असे सांगून वेळ मारून नेतात. यावरून सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. नरेंद्र मोदी भाषणातून मोठ-मोठ्या विकासाची ब्रह्म स्वप्ने दाखवतात, प्रत्यक्षात मात्र देशात कोणताही विकास झाला नाही. देशावर  लाखो कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. अशा भ्रष्ट सरकारला घरी बसण्याची वेळ आल्याचा इशाराही यावेळी पवार यांनी दिला.''

विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात उड्डाणपूल, भुयारी मार्ग, वाहतुकीचे कोणतेही प्रश्न जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ते सोडवले नाहीत. वेळोवेळी खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल केली आहे. असे सांगून  राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, "महिला, मुले यांच्या स्वास्थ्यासाठी हडपसर मध्ये कोणत्या योजना राबवल्या नाही. केंद्र सरकारच्या योजना राबवल्या नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. फक्त खोटी आश्वासने द्यायची,  थापा मारायच्या यावर दहा वर्षे काढली. आगामी काळात जनता तुम्हाला माफ करणार नाही.  चौकार मारायचं स्वप्न सोडाच, तुम्हाला घरी बसावे लागेल.'  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रशांत तुपे, राजलक्ष्मी भोसले,  अँड. जयदेव गायकवाड यांची भाषणे झाली.

माझ्या कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये
"नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात व पवार कुटुंबियांच्यावर टीका करतात. मला एकच मुलगी आहे, ती स्वतंत्र संसार करत आहे. तसेच लोकसभेत चांगला कारभार करत आहे. मोदींनी माझ्या कुटुंबाची काळजी करण्याऐवजी देशाला ज्या भ्रष्टाचाराच्या खाईत ढकलले आहे याची काळजी करावी, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

Web Title : NCP chief Sharad Pawar attacks Narendra Modi in Loksabha election campaign


संबंधित बातम्या

Saam TV Live