शौचालयाची टाकी साफ करताना दोघांचा गुदमरून मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

परळी वैजनाथ : येथील शिवाजीनगर भागात मध्यरात्री शौचालयाच्या टाकीचे काम करत असताना गुदमरून दोघांचा मृत्यू, तर तिघेजण गंभीर असल्याने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.

येथील शिवाजीनगर भागात माणिक बाबुराव पोपळघट यांच्या घरी शौचालयाच्या हौदाचे काम करत असताना गुदमरून शहरातील साठे नगर भागातील दोन मजूरांचा गुदमरून मृत्यू झाला असून तर तिघांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले आहे.

रात्री बाराच्या सुमारास शौचालयाच्या हौद साफसफाई करत असताना हौदातील गॅसमुळे ही घटना घडली. अशी प्राथमिक माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. या घटनेत अर्जुन रमेश भालेराव (वय 20), विशाल शिवाजी लांडगे (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे तर कार्तिक भीमा कांबळे, शिवाजी यादव लांडगे, विशाल रमेश भालेराव यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 2 dies while cleaning toilet tank in Parali Vaijanath

संबंधित बातम्या

Saam TV Live