आजपासून पुण्यात 'ही' दुकानं बंद राहणार... वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 17 मार्च 2020

शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून तीन दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरुवारपर्यंत शहरातील घाऊक आणि किरकोळ व्यापार बंद राहणार आहे. मात्र, या बंदमधून जीवनावश्‍यक वस्तू किराणा, दूध, भाजीपाला, औषधी दुकाने आदींना वगळण्यात आले आहे. 

 

पुण्यामध्ये संचारबंदी नाही तर जमावबंदी लागू करण्यात आलीय. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पुण्यात संचारबंदी लागू केली जाईल अशी चर्चा होती. मात्र, संचारबंदी लागू न करता जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गर्दीने विनाकारण फिरू नका, असं आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केलंय. पुण्यात आतापर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर 27जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, 'करोना'च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,' असाही इशारा देण्यात आलाय.

CORONA CARE | मुंबईपाठोपाठ आता 'या' ठिकाणीही जमावबंदी
 

 

दरम्यान यासह आजपासून तीन दिवस पुण्यातील दुकानं बंद राहणार आहेत. व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातले घाऊक आणि रिटेल दुकानदार आपापली दुकानं बंद ठेवणार आहेत. मात्र, दूध, भाजीपाला, किराणा आणि मेडिकलची दुकानं सुरुच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

हे चालू राहणार 
- किराणा दुकान 
- औषधी दुकान 
- दूध डेअरी 
- फळे, भाजीपाला 

हे बंद राहणार 
- कापड दुकान 
- हार्डवेअर 
- मोबाईल शॉपी 
- स्टेशनरी आणि कटलरी 
- सराफी दुकान 
- इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक्‍स 

कोरोनाला घाबरताय? मग हे पाहाच! सगळी भीती निघून जाईल
 

 

जीवनावश्‍यक वस्तूंअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील भुसार बाजार सुरूच ठेवण्यात येणार आहे. यामुळे बंदच्या काळातही किराणा माल, गूळ, भुसार आदी क्षेत्रातील व्यापार सुरळीतपणे सुरू राहणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live