शरीराला गारवा देणाऱ्या पाकिस्तानी ‘रुह अफजा’ सरबताची बाजारपेठेत टंचाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

पुणे : कडक उन्हाची लाही कमी करण्यासाठी आणि शरीराला गारवा देणाऱ्या ‘रुह अफजा’ सरबताची बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. काही मॉलमध्ये ते उपलब्ध असले, तरी उपनगर तसेच शहराच्या मध्य भागातील बाजारपेठेत ते मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरबत शोधण्यासाठी नागरिकांना अनेक दुकाने पालथी घालावी लागत आहेत.

हमदर्द लॅबोरेटरीज्‌च्या अनेक उत्पादनांपैकी एक ‘रुह अफजा’ सरबत देशातच नव्हे, तर परदेशातही लोकप्रिय आहे. हकीम हफीज अब्दुल हमीद यांनी गाझियाबादमध्ये १९०६ मध्ये या सरबताचे उत्पादन सुरू केले. पुढे फाळणीनंतर या कुटुंबातील काही जण पाकिस्तानात गेले. त्यांनी तेथेही ‘हमदर्द लॅबोरेटरीज्‌’ची शाखा उघडली. तेथेही हे सरबत लोकप्रिय झाल्यावर पुढे बांगलादेशात पोचले. उन्हाळ्यात या सरबताचा खप मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः रमजानच्या महिन्यात रोजे सोडताना ‘इफ्तार’च्या कार्यक्रमात या सरबताचा आवर्जून आस्वाद घेतला जातो.

मार्केट यार्डातील व्यापारी अनिल अग्रवाल म्हणाले, ‘‘मागणीच्या तुलनेत उपलब्ध होत नसल्यामुळे ‘रुह अफजा’ सरबताची टंचाई निर्माण झाली आहे. असलेला स्टॉक शोधण्यासाठी नागरिकांना अनेक दुकानांमध्ये शोध घ्यावा लागतो. उन्हाळा आणि रमजानच्या महिन्यामुळे या सरबताची मागणी वाढली आहे.’’ 

विविध फळांचा रस आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क वापरून वैशिष्ट्यपूर्ण मिश्रणामुळे हे सरबत नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे. 

याबाबत मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते अनिस चिश्‍ती म्हणाले, ‘‘हमदर्दच्या उत्पादनांना शंभर वर्षांपेक्षा जास्त परंपरा आहे. ‘रुह अफजा’ हे लोकप्रिय सरबत आहे.’’

Web Title: Summer Temperature Rooh Afza Shortage

संबंधित बातम्या

Saam TV Live