पुरोगामी पुणं अंधश्रद्धेच्या विळख्यात ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरीतील आचार्य अत्रे नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे अंधश्रद्धेमुळे काम रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे रंगमंदिरात नूतनीकरणाचे काम सुरू असताना एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा आणि तिच्या बांगडय़ांचा आवाज होत असल्याचा भास काहींना झाला. या प्रकाराने सर्वांनी तेथून पाय काढल्याने नूतनीकरणाचे काम काही काळासाठी बंद पडले होते. त्यानंतर नाट्यगृह परिसरात विधिवत पूजाअर्चा पार पडली आणि काम पूर्ववत झालं. या सर्व प्रकारामुळे पिंपरीकरांमध्ये अत्रे नाट्यगृहात भुताचा प्रयोग रंगल्याच्या चर्चा होती.  

संबंधित बातम्या

Saam TV Live