पुण्यात स्वारगेटची कोंडी सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

पुणे - नागरिकांना वाहतुकीसह अन्य आधुनिक सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट हब’मधील एसटी स्थानकाच्या विकसनाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे. पर्यायी जागा निश्‍चित करून स्थानकाचे स्थलांतर करणे, विकसनाचा आराखडा, निविदा ही प्रक्रिया आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्‍यता कमी असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. 

नागरिकांना मेट्रो, पीएमपी आणि एसटी या सार्वजनिक वाहतूक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रोकडून स्वारगेट येथे ‘मल्टिमोडल हब’ उभारले जात आहे. त्याचे कामदेखील सुरू झाले आहे. या हबमध्ये स्वारगेट येथील एसटी स्थानकाचा समावेश आहे. त्याअंतर्गत तीनमजली इमारत उभारून या स्थानकाची नव्याने बांधणी करून प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मात्र, एसटी स्थानकाचे काम सुरू झाल्यावर सध्याच्या स्थानकाचे स्थलांतर  कोठे करायचे, हे निश्‍चित झालेले नाही. तसेच, एसटी स्थानकाच्या विकसनाचा नियोजित आराखडाही तयार झालेला नाही. त्यामुळे निविदा तयार करणे आणि त्या प्रसिद्ध करणे, याला किमान सहा महिने लागू शकतात. तसेच महामेट्रोने तयार केलेल्या आराखड्याला एसटी महामंडळाची मंजुरी लागणार आहे. परंतु आराखडाच तयार झालेला नसल्यामुळे याबाबत मर्यादा आल्या आहेत. त्यातच सुमारे तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. आचारसंहितेमुळेदेखील हे काम रखडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एसटी स्थानकाच्या विकसनाला विधानसभा निवडणुकीनंतर प्रारंभ होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आवश्‍यक सुविधांची कामे करणार
स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या कामाची प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने त्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्थानकातील रखडलेली कामे करण्याची तयारी एसटी प्रशासनाने केली आहे. स्थानकातील पायाभूत सुविधांची डागडुजी, रंगरंगोटी आणि प्रवाशांना आवश्‍यक असणाऱ्या सुविधांची कामे सध्या तातडीने होणार आहेत.

स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या स्थलांतराची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. यामुळे स्थलांतराचा विषय लांबणीवर पडला आहे. शिवाजीनगर येथील बस स्थानकाचे स्थलांतर झाल्यानंतर स्वारगेट स्थानकाचे काम सुरू होईल. 
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ

Web Title: Pune swargate traffic issue

संबंधित बातम्या

Saam TV Live