(VIDEO) #MeToo : पुण्यातील सिम्बायोसिसमधील विद्यार्थिनीचे प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे आरोप..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे : सोशल मीडियावर चालु असलेल्या #MeeToo चळवळीमार्फत पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन(एससीएमसी) मध्ये झालेल्या  लैंगिक शोषणा विरोधात आवाज उठवला जात आहे. एससीएमसीमधील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात  #MeeToo मार्फत सोशल मीडियावर लिहले आहे.

महाविद्यालयात झालेल्या गैरवर्तणुकीबद्दल काही विद्यार्थ्यांनी लिहले आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये प्राध्यपकांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर एससीएमसी 2011 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी 7 वर्षांपुर्वी झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात सोशल मीडियाद्वारे आवाज उठवला आहे. 2011  घडलेल्या काही गैरप्रकारामध्ये सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची नावे त्यांनी दिली आहेत. तसेच एससीएमसीच्या प्रशासनावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर झालेल्या टिकेची दखल घेत सोमवारी (ता.8) एससीएमसीने फेसबुक पेजवर ओपन लेटरद्वारे जाहीर माफी मागितली. आजी आणि माजी विद्यार्थिनींना पुढे येऊन अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी नोंदवण्याचे आणि सूचना करण्याचे आवाहन केले. तसेच त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

WenTitle marathi news pune symbiosis me too sexual abuse  

संबंधित बातम्या

Saam TV Live