BREAKING | पुण्यात सापडला हॅण्डग्रेनाईट बॉम्ब | VIDEO

BREAKING | पुण्यात सापडला हॅण्डग्रेनाईट बॉम्ब | VIDEO

पुणे : ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदृश्‍य वस्तू सापडली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली. 

लष्कराला ही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नष्ट केलेल्या हॅण्डग्रेनाईड सदृश्‍य वस्तूचे अंश पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. ताडीवाला रस्त्यावर रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. त्या शेजारीच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पादाचारी उड्डाणपुल आहे.

या पुलाशेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला हॅण्डग्रेनाईड सदृश्‍य वस्तू आढळली.

Web Title: A thing found like Bomb in Tadiwala Road Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com