पुणे - सातारा महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकींना धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. 

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सर्व मित्र तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे येथे राहणारे आहेत. मित्राचा वाढदिवस साजरा करुन खेड-शिवापूर येथील दर्ग्याला दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी ट्रकने मागून धडक दिल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला. सुशील गोपाळ कांबळे, सूरज काकाजी शिंदे, अनिकेत भारत रणदिवे अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: three dead in accident on Pune-Satara highway

संबंधित बातम्या

Saam TV Live