गणेशोत्सव विसर्जनादरम्यान पुण्यातील हे रस्ते आहेत बंद..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद रस्ते 
 शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक
 लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक 
 बाजीराव रस्ता - बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक
 कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे मिठाईवाले
 केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक
 टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक
 शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी पुलावरून स्वारगेटकडे जाणारी चारचाकी वाहतूक आज बंद करण्यात आली आहे. शनिवारवाड्यापासून पुढे जाण्यास बंदी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पादचाऱ्यांची गर्दी झाली आहे. पुण्यात गणपती विसर्जनापूर्वीच वाहतूक कोंडी होत असून टप्प्याटप्प्याने रस्ते बंद केले जात आहे. 

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पोलिस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका या अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांसाठी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. सोमवारी दुपारनंतर टप्प्याटप्प्याने रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. 

असा वर्तुळाकार मार्ग
कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती रुग्णालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी, मार्केट यार्ड, सातारा रस्ता, व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद रस्ते 
 शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक
 लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक 
 बाजीराव रस्ता - बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक
 कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे मिठाईवाले
 केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक
 टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक
 शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक

WebTitle : marathi news pune traffic diversions during ganesh immersion 


संबंधित बातम्या

Saam TV Live