loksabha 2019 : पुण्यातील चौकीदारांना सोशल मीडियावरून पक्षाचा प्रचार करण्याचे प्रशिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे - लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले नसले, तरी सोशल मीडियावरून पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपने पुण्यातील चौकीदारांना प्रशिक्षण देऊन त्यांना सज्ज केले आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करा, विरोधकांच्या टीकेला उत्तर द्या, अशी भाजपची रणनीती ठरली आहे. 

‘नरेंद्र मोदी पुन्हा’ ही सोशल मीडिया कार्यशाळा पार पडली. भाजपचे केंद्रीय सचिव सुनील देवधर, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सोशल मीडिया सेलचे राज्याचे प्रमुख आशिष मेरखेड आदी या वेळी उपस्थित होते. 

मुद्रा बॅंक, जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, आयुषमान भारत, स्वच्छ भारत योजना, स्टर्टअप यांसह अनेक योजनांची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करा. जास्तीत जास्त पोस्ट शेअर करून सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला, टीकेला उत्तर द्या, असे देवधर यांनी सांगितले.

Web Title: Training by the BJP on Social Media

संबंधित बातम्या

Saam TV Live