पुणे पोलिसांनी केला दोन भोंदूंचा पर्दाफाश; अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुणे पोलिसांनी केला दोन भोंदूंचा पर्दाफाश; अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुणे - दिवसभर सत्संग शिबिरामध्ये विद्यार्थी बनून आणि त्यानंतर शहरात फिरून ‘ते’ दोघे लोकांना संस्कारांचे उपदेश देत होते. मात्र उपदेश देतानाच ते बंद घरांची पाहणीही करायचे आणि रात्री येऊन हे सत्संग विद्यार्थी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरत होते. अखेर हडपसर पोलिसांनी या दोन भोंदूचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

सागर दत्तात्रेय भालेराव (वय २१, रा. मांजरी, हडपसर), स्वप्नील नामदेव गिरमे (वय २४, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हडपसर परिसरामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये काही महिन्यांपासून वाढ झाली होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. त्या वेळी आळंदीतील एका सत्संग शिबिरामधील दोघे जण हडपसर परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने हडपसरमधीलच मंत्री मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार असल्याची खबर पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलिस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना आज ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, पाच दुचाकी, दहा मोबाईल, दोन एलसीडी टीव्ही, एक कॅमेरा व २६ हजार रुपये रोख असा अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी हडपसर, सहकारनगर, मुंढवा, वानवडी, चंदननगर, दिघी येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्या दरम्यान हे दोघे आळंदी येथील एका सत्संग शिबिरामध्ये सत्संग विद्यार्थी बनून राहत होते. रात्रीच्या वेळी हडपसर परिसरातील बंद घरांचे निरीक्षण करून तेथे घरफोडी करत होते. त्याचबरोबर दुचाकी वाहनेही चोरत होते. 

Web Title: Students of two Satsang camp seized eleven lakh rupees of their own

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com