''पवारसाहेब, तुम्ही एक चूक केली, पण दुसरीही चूक केली असे मी म्हणणार नाही''

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 डिसेंबर 2019

पुणे : ''शरद पवार यांच्या चमत्कारामुळेच हे सरकार आले आहे. माझ्या वडिलांचे मित्र शरद पवार यांनी मला प्रेमाने आदेश दिला, की तुला आता मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागेल. त्यामुळे मी जर चुकीचे बोललो तर, आता त्यांना जबाबदार धरा. याच व्यासपीठावर कोणी म्हटले होते की, ''तुमचे बोट धरून राजकारणात आलो. तुम्ही एक चूक केली, पण दुसरीही चूक केली असे मी म्हणणार नाही'', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : ठाकरे सरकार देणार आणखी एक दणका; ऍक्सिस बँकचं अकाऊंट बंद?

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी नेते अजित पवार व हर्षवर्धन पाटील एकत्र बसले होते याचीच चर्चा मिडीयात सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अर्थमंत्री जयंत पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, प्रकाश आवाडे, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी साखर संघाच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Image

उद्धव ठाकरे म्हणाले, ''शेतकऱ्यांना कमीत कमी जागेत जसे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे पवारसाहेब सांगतात. तसेच राजकीय क्षेत्रातही त्यांनी करून दाखविले आहे. कमीत-कमी जागा असणाऱ्यांना त्यांनी सत्तेत आणून दाखविले आहे. आमच्या सरकारला पीककर्जातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत. शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणून हे सरकार काम करणार आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्यांसाठी योजना आणण्यात येईल. एक उस मोडु शकतो, मोळी मोडू शकत नाही.''

Image

उद्धव ठाकरे शब्द पाळतील : शरद पवार
''शब्द न पाळल्याने उद्धव ठाकरेंना संघर्ष करावा लागत आहे. उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतील. इथेनॉल, वीज अशा अनेक समस्या आहेत. मात्र, तरीही अनेक कारखाने चांगले काम करत आहेत.'' 

31 जानेवारीला आंतरराष्ट्रीय साखर परिषद
''येत्या 31 जानेवारीला आंतरराष्ट्रीय साखर परिषद होणार असून 22 देशाचे या क्षेत्रातील जाणकार सहभागी होतील. तंत्रज्ञाना केलेल बदलांबाबत मार्गदर्शन करणार आहेत'', अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.  

Web Title: Uddhav Thackeray Speaks about formation of Government in pune

संबंधित बातम्या

Saam TV Live