पुण्यात साखळी चोरट्यांचा धुमाकुळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

पुणे : शहरात सकाळी सकाळी साखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, एका पाठोपाठ सहा घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळे तर लोखंडे तालिम येथे दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. ही घटना सकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

वानवडी येथे जगताप चौकात दोन तोळ्याचे मंगळसुत्र तर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३.३ तोळ्याचे दागिने लंपास केले. बिबवेवाडी परिसरात मानस अपार्टमेंट येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास दीड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरसीएम काॅलेज येथे सकाळी पावणे वाजता चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून चोरट्यांनी सलग पाच साखळी चोऱ्या केल्या. या घटनांची माहिती मिळताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. हे सर्व गुन्हे एकाच टोळीने केल्याची शक्यता आहे.

WEB TITLE : MARATHI NEWS PUNE VARIOUS INCIDENCES OF CHAIN SNATCHING NOTED IN PUNE 

संबंधित बातम्या

Saam TV Live