पुण्यात पाणीकपात; लष्कर, हडपसर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या पाणी कपातीच्या निर्णयाचा फटका पुणेकरांना बसला असून आज लष्कर, हडपसर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

पुण्याला 1600 एमएलडीऐवजी 1150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा समिती मध्ये झाला, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री लष्कर पंपिंग स्टेशन ला पाणीपुरवठा करणारा पंप बंद केला. त्यामुळे लष्कर भागात पाणी गेले नाही. परिणामी लष्कर, हडपसर आणि पूर्व भागात पाणीपुरवठा झाला नाही.
नागरिकांची त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली.

या पाणी कपातीबाबत महापालिकेतील विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी संताप व्यक्त केला असून, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजन शून्य निर्णयामुळेच पुणेकरांवर कपातीचे संकट कोसळले असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून दुपारपर्यंत तो सुरळीत करु असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणालेत. 

''एवढा पाऊस झाला तरी पाणीकपात हे कसले नियोजन. आज पाणी नसल्याने ऐन सणाच्या दिवसात सर्व कामे खोळंबली."- रमेश जगताप, नागरिक हडपसर.

WebTitle : marathi news pune water cut after canal burst in city camp and hadapsar areas affected 

संबंधित बातम्या

Saam TV Live