पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होणार  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे प्राधिकरणाचा नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढा म्हणजे महापालिकेच्या एका जलशुद्धीकरण केंद्राला पुरेल एवढाच पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. परिणामी शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 
पुणे शहराला लोकसंख्येनुसार आणि प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पाणी पुरवठा करावा, अशी मागणी एका नागरीकाने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यावर मागणीवर निर्णय घेण्यासाठी जलसंपदा विभागाकडून मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंडे यांनी ती मागणी मान्य करीत पुणे शहराला प्रती माणशी 135 लिटर अधिक 15 टक्के गळती अशी सुमारे 155 लिटर प्रती माणशी पाणी पुरवठा करावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात मोठी कपात करावी लागणार होती. त्यावर पुणे महापालिकेकडून या संदर्भात प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. 

त्यामध्ये दोन कॅन्टोमेन्ट, हद्दीत समाविष्ट नव्याने समाविष्ट झालेली गावे, हद्दीबाहेरील ग्रामपंचायती आणि शहरात असलेल्या लष्करसह केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या आस्थापना आणि गळती यांचा विचार करता पुणे शहराला 150 अधिक 35 टक्के गळती असे गृहीत धरून प्रतिदिन 1250 एमएलडी पाणी पुरवठा करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी याचिकेत महापालिकेकडून याचिकेत करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये महापालिकेचे याचिका प्राधिकरणाकडून फेटाळण्यात आली. 

मात्र प्राधिकरणाचा निर्णय मान्य नसल्यास महापालिकेला या संदर्भात राज्य सरकारकडे पुन्हा एकदा याचिका करता येईल. ती करताना महापालिकेने सर्वबाबींचा विचार करून शहरासाठी आवश्‍यक तेवढा पाणी पुरवठासाठी मागणी करावी, अशा सूचनाही प्राधिक रणाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडे झगडावे लागणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live