पुणेकरांसाठी खुशखबर; पुणे शहरातील पाणी कपात थांबणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला एकवेळ पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: वडगाव जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत विविध भागांत आठवड्यातून एक दिवस होणारी कपात थांबविली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत नव्याने वेळापत्रक तयार करून त्यानुसार पाणीपुरवठा केला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. 

धरणांत पुरेसा पाणीसाठा नसल्याने दीड महिन्यापूर्वी वडगाव जलकेंदातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे कात्रज, धनकवडी, कोंढवा आणि सिंहगड रस्त्यासह परिसरातील नागरिकांना अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीकपात सहन करावी लागत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. त्यामुळे सर्वत्र समान पाणी देण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्यावर पुढील दहा दिवसांत संपूर्ण शहराला रोज एकवेळ पुरेसे पाणी देण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिला होता. महापौरांच्या आदेशाला पंधरा दिवस झाले तरी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही केली नव्हती. 

धरणांत ६५ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर महापौरांच्या आदेशानुसार कार्यवाही होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यातच धरणांत सध्या सुमारे ७२ टक्के पाणीसाठा आहे. त्यात पुढील आठ दिवसांत आणखी काही वाढ होईल, असा पाणी अंदाज पाणीपुरवठा विभागाचा आहे. अपेक्षित पाणी असल्याने पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘धरणांत पाणीसाठा वाढला आहे. त्यानुसार नव्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. त्याबाबत खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन दोन दिवसांत निर्णय  घेऊ.’’

Web Title: Water reduction in Pune city will now stop

संबंधित बातम्या

Saam TV Live