पुणे शहर आणि परिसरात पारा पुन्हा चाळिशीवर जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

पुणे शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला आहे. विदर्भात पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे वैशाख वणव्याची दाहकता कमी झाली आहे. राज्यात सर्वांधिक तापमान मालेगाव येथे 44.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. लोहगाव येथे 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेले काही दिवस सातत्याने कमाल तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस असलेला चंद्रपूरचा पारा कमी 42.2 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे. पुण्यात मात्र उन्हाचा चटका वाढत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live