मॉलमध्ये आता पार्किंगसाठी शुल्क भरण्याची गरज नाही..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

पुणे : शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वसूल केले जाणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॉलमध्ये आता पार्किंगसाठी शुल्क भरण्याची गरज राहणार नाही. 

पुणे मनपाच्या शहर सुधारणा समितीची आज (शुक्रवार) बैठक झाली. त्यामध्ये या पार्किंग शुल्कावर चर्चा झाली. यापुढे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी शुल्क वसूल करणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यासंदर्भात सर्व मॉलला लवकरच नोटीसही पाठविली जाणार आहे. या विषयाचा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती शहर सुधाणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली. 

गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरात मॉलची संख्या वाढली आहे. येथे जाणाऱ्या ग्राहकांना त्या मॉलची पार्किंगची सुविधा वापरण्यासाठी शुल्क भरावे लागत होते. अनेक ठिकाणी दुचाकींसाठी 20 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी 40 रुपये असे शुल्क आकारले जात होते. ही शुल्क आकारणी आता बेकायदा असल्याचे मनपाने जाहीर केले आहे. 

Web Title: No parking fee in Pune Malls declares Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Saam TV Live