पार्थ पवार किंवा सुजय विखे, केवळ नेत्यांची मुलं म्हणून उमेदवारी द्यायची का? विजय शिवतारे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने समाजासाठी खपलेल्या माणसांना डावलून त्यांना उमेदवारी दिली जात आहे, हे चुकीचे आहे,' अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी टिका केली. 

पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने समाजासाठी खपलेल्या माणसांना डावलून त्यांना उमेदवारी दिली जात आहे, हे चुकीचे आहे,' अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी टिका केली. 

शिवतारे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांची उमेदवारी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावर शिवतारे यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील घराणेशाहीकडे बोट दाखत टीका करण्याची संधी साधली. 

शिवतारे म्हणाले, "समाजात अनेक सुशिक्षीत, समाजासाठी झटणारे तरुण आहेत. मात्र, कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ नेत्यांची मुले म्हणून राष्ट्रवादीकडून पार्थ तर भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. कोणतेही काम नसताना, कर्तृत्व नसताना हे दोघे कसे समाजासाठी धडपडणारे आहे, हे समाजमाध्यमांद्वारे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असे सांगून "युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या गोष्टीला अपवाद असून ते अत्यंत संवेदनशिल नेते आहेत,' असे जाणीवपूर्वक शिवतारे आपले मत यावेळी नोंदविले. आदित्य ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून समाजात जाऊन जनेतेचे प्रश्न सोडवत असून ते फक्त संघटनेसाठी नाही तर समजासाठी झटणारा नेता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात पवार विरोध लाट 
''राज्यात प्रचंड प्रमाणात पवार विरोधी लाट आहे. माढ्यातही ही लाट होती. खासदार असताना त्यांनी तेथील जनतेची फसवणूक केली. नाराजीची लाट ओळखूनच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली'', असे सांगून शिवतारे म्हणाले," सुप्रिया सुळे या गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत काठावर पास झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्याविषयी मोठी नाराजी आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी केंद्राचा एकही प्रकल्प आणला नाही. त्यामुळे तगडा उमेदवार द्या अथवा देवू नका, ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी अवघड आहे.'' 

मी योद्धा आहे आणि योद्धा तलवार काढून नेहमी सज्ज असतो
बारामती लोकसभा मतदार संघातून 2014 मध्ये शिवतारे इच्छुक होते. तो धागा पकडून खासदारकीसाठी तुम्ही उभे का राहत नाही, असे विचारले असता शिवतारे म्हणाले, "तिकीट देण्यासंदर्भातील सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतात. बारामती मतदारसंघ भाजपचा आहे. त्यामुळे येथे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निणर्य भाजप घेईल. मात्र, मी योद्धा आहे आणि योद्धा तलवार काढून नेहमी सज्ज असतो,' असे सांगून थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. 
 

Web Title: What is the work of Partha Pawar and Sujoy Vikhe: Vijay Shivtare


संबंधित बातम्या

Saam TV Live