पुणे एल्गार परिषद प्रकरणातील पाच जणांची सुटका करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

 एल्गार परिषदेच्या नक्षली संबंधांच्या आरोपात अटक झालेल्या पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून आरोपींना अटक करण्याऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे.

पुणे पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी देशातील चार राज्यातील विविध शहरांमध्ये छापा टाकून सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे पाच जणांची सुटका करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.

पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आज उत्तर देण्यास सांगितलं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live