उभ्या आयुष्यात एकदाही वीज न वापरलेली व्यक्ती तुम्ही कधी पाहिली आहे का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे - घराभोवती जंगल असलेली; चिचुंद्री, उंदीर असे अनेक प्राणी आणि पक्षी कुटुंबाचे सदस्य असलेली आणि मुख्य म्हणजे उभ्या आयुष्यात एकदाही वीज न वापरलेली व्यक्ती तुम्ही कधी पाहिली आहे? आश्‍चर्याची बाब म्हणजे अशी व्यक्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच राहते.

पुणे - घराभोवती जंगल असलेली; चिचुंद्री, उंदीर असे अनेक प्राणी आणि पक्षी कुटुंबाचे सदस्य असलेली आणि मुख्य म्हणजे उभ्या आयुष्यात एकदाही वीज न वापरलेली व्यक्ती तुम्ही कधी पाहिली आहे? आश्‍चर्याची बाब म्हणजे अशी व्यक्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच राहते.

तांबडी जोगेश्‍वरी मंदिराजवळ घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे अगदी जंगल म्हणले तरी हरकत नाही अशा ठिकाणी प्रा. हेमा साने राहत आहेत. तसेच, ७८ वर्षे वीज न वापरता रात्री जेव्हा गरज असेल तेव्हा त्या फक्त सौरदिव्यांचा वापर करतात. पर्यावरणप्रेमी असल्याने वनस्पती आणि झाडे हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात जाताना पाऊलवाटेच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावली आहेत. घरात गेल्यानंतर अनेक दिवस या घरात कोणी राहत असेल यावर विश्‍वास बसत नाही. साने १९६२ ते २००० या कालाधीत वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. कमळ, जास्वंदी, पुण्यातील दुर्मीळ वृक्ष, हिरवे मित्र, बुद्ध आणि बुद्ध परंपरा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. विजेचा गैरवापर टाळण्यासाठी पूर्णपणे पर्यावरणवादी पद्धतीने त्या राहतात. चिचुंद्री, उंदीर असे छोटे प्राणी- कीटक, मांजर, कुत्रा हे त्यांच्या घरातील सदस्य आहेत.

आपण पर्यावरण, विजेचा बेसुमार वापर करत आहोत याची कोणालाच कल्पना नाही. त्याचप्रमाणे जगात कोणालाही आदर राहिलेला नाही. त्यामुळे मी फारशी घराबाहेर जात नाही. माझ्याकडे बघून अनेक जण मला भिकारी समजतील. परंतु मी कशाचाच विचार न करता माझे आयुष्य जगते.
- हेमा साने, निवृत्त प्राध्यापक

Web Title: Electricity Hema Sane


संबंधित बातम्या

Saam TV Live