6 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणानंतर शेतकऱ्यांच्या मुलींना उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल 

6 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणानंतर शेतकऱ्यांच्या मुलींना उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल 

पुणतांबा, जि. नगर : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुणतांबा (जि. नगर) येथे अन्नत्याग उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना आज (शनिवार) पहाटे रुग्णालयात दाखल केले आहे. दोघींवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत. 

शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग अंदोलन शुक्रवारी (ता. ८) पाचव्या दिवशीही सुरूच होते. सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंदोलनकर्त्या मुलींसह गावकऱ्यांशी चर्चा केली, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत अंदोलन मागे घ्यायचे नाही, यावर अंदोलनकर्त्या तरुणी ठाम राहिल्या. अखेर पोलिसांनी आज पहाटे या मुलींना घेऊन जात रुग्णालयात दाखल केले. चारपैकी दोन मुलींवर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, निकिता जाधव आणि पूनम जाधव यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. 

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गावकरी परिसरातील शेतकऱ्यांनी पुणतांब्यात रास्ता रोको अंदोलन केले. दरम्यान प्रकृती बिघडलेल्या शुभांगी जाधव या तरुणीला गावकरी आणि उपोषणकर्त्यांचा विरोध मोडून प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे गावकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.   

शेतकरी संपावेळी शासनाने दिलेल्या अश्‍वासनाची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी पुणतांबे (जि. नगर) येथे सोमवार (ता. ४) पासून निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या महाविद्यालयीन शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग अंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी अंदोलनाचा पाचवा दिवस होता.

Web Title:  After 6 days of fasting, farmer's daughters have been admitted to the hospital for treatment

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com