राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जून 2019

मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार) आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढा खासदार रणजित निंबाळकर यांच्यात आज सकाळी बैठक पार पडली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटल यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'काँग्रेसने माझी कोंडी केली असून, आता पक्षात माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्षकडे राजीनामा देणार आहे. इतर आमदार भेटत राहतात, माझ्यासोबत राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, आज मी एकटा राजीनामा देणार आहे.'

 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बरोबर सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र, आमदार सत्तारांच्या प्रवेशास भाजप पदाधिका-यांकडूनच विरोध सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विधान भवनात राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर आमदार सत्तारांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान, भाजपच्या वाटेवर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. युतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांना शिवसेना जागा सोडणार का? राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 ते 12 बंडखोर आमदारांना युतीच्या जागावाटपात स्थान मिळणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युतीत शिवसेना-भाजप 135-135 जागा आणि घटक पक्षांना उर्वरित 18 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा फॉर्म्युला निश्चित झाल्यास भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांना जागावाटपात स्थान मिळणार का? याबाबत संभ्रम कायम आहे. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live